सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, आमदारकी जाणार? याचिकाकर्ते आजच सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा
  • माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मात्र आमदारकीला धोका कायम
  • 41व्या वर्षांची भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; लिंबाचिया कुटुंबात चिमुकल्या पावलांनी गोड पाहुण्याचं आगमन
  • माणिकराव कोकाटेंसंदर्भात महत्वाची अपडेट, प्रकृती स्थिर असल्यास अटकेची शक्यता; वरिष्ठांशी सल्लामसलत करून नाशिक पोलिस निर्णय घेणार
  • माणिकराव कोकाटेंची प्रकृती बिघडली? अँजिओग्राफीसाठी नेलं, रुग्णालयात कोकटेंची मुलगी अन् पत्नी उपस्थित
 विश्लेषण

एका फोन नंबरमुळे तिन्ही आरोपी जेरबंद, संभाजीनगर हादरले;रूम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये प्रवेश; जबरदस्तीने बिअर पाजून सामूहिक अत्याचार

डिजिटल पुणे    19-12-2025 16:35:21

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये 30 वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अवघ्या तीन तासांत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी हॉटेलच्या 105 रूममध्ये ती थांबली होती. दरम्यान तिला फोन आल्याने ती काही वेळासाठी बाहेर गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी ती एका मित्रासोबत शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. दोघेही खोली क्रमांक 105 मध्ये थांबले होते.रात्री मित्र झोपल्यानंतर तरुणी फोनवर बोलण्यासाठी खोलीबाहेर आली. मात्र परत येताना चुकून ती खोली क्रमांक 105 ऐवजी 205 मध्ये गेली. त्या खोलीत तीन तरुण दारू पित बसले होते.आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात येताच तरुणी बाहेर पडली. मात्र आरोपींपैकी एकाने तिचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने पुन्हा खोलीत नेले. त्यानंतर तिघांनी मिळून तिला बळजबरीने बिअर पाजली. शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला, असा पीडितेचा आरोप आहे.

जबरदस्तीने बिअर पाजली, सामूहिक अत्याचार केला

आरोपींनी तरूणीला जबरदस्तीने बिअर पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान ती त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि पळून गेली. पीडितेने ताबडतोब वेदांतनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे.

एका क्रमांकावर आवळल्या तिघांच्या मुसक्या

तर मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी मित्र असून ते फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचे काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी रूम बुक केली होती. यादरम्यान त्यांनी एकाचा नंबर दिला होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून तिघांच्या मुसक्या आवळल्या. 

खोली क्रमांक १०५ ऐवजी २०५ मध्ये

पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा फोनवरती बोलत खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी ऋषिकेश, घनश्याम व किरण दारूचे पीत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली. मात्र, एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बिअर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.

तिन्ही आरोपी मित्र असून ते एका फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी रात्री त्यांनी दारू पिण्यासाठी संबंधित हॉटेलमध्ये खोली बुक केली होती.या प्रकरणाचा पुढील तपास तपास अधिकारी प्रवीण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती