सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, आमदारकी जाणार? याचिकाकर्ते आजच सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा
  • माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मात्र आमदारकीला धोका कायम
  • 41व्या वर्षांची भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; लिंबाचिया कुटुंबात चिमुकल्या पावलांनी गोड पाहुण्याचं आगमन
  • माणिकराव कोकाटेंसंदर्भात महत्वाची अपडेट, प्रकृती स्थिर असल्यास अटकेची शक्यता; वरिष्ठांशी सल्लामसलत करून नाशिक पोलिस निर्णय घेणार
  • माणिकराव कोकाटेंची प्रकृती बिघडली? अँजिओग्राफीसाठी नेलं, रुग्णालयात कोकटेंची मुलगी अन् पत्नी उपस्थित
 DIGITAL PUNE NEWS

निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळ; माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात मृतदेह, अपघात की घातपात?

डिजिटल पुणे    19-12-2025 17:32:17

नाशिक : ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी (वय 52) यांचा संशयास्पद मृतदेह पळसे–शिंदे परिसरातील एका नाल्यात आढळून आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते बेपत्ता होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

कैलास चौधरी हे 11 डिसेंबर रोजी सकाळी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचितांकडे चौकशी करूनही काहीही माहिती न मिळाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

दरम्यान, गुरुवारी (दि. 18) सकाळी पळसे गावाजवळील एका पुलाखाली नाल्यात मृतदेह आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेह बेपत्ता असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेह आढळल्याची बातमी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, हा अपघाती मृत्यू आहे की घातपात, याचा सखोल तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.निवडणुकीच्या काळात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती