सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
  • एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा तरी धंगेकर 165 जागांसाठी मागणी करणार; पुण्यात स्थानिक नेत्यांची आज बैठक, जागावाटपामध्ये एकमत होणार?
  • माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, आमदारकी जाणार? याचिकाकर्ते आजच सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा
  • माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मात्र आमदारकीला धोका कायम
  • 41व्या वर्षांची भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; लिंबाचिया कुटुंबात चिमुकल्या पावलांनी गोड पाहुण्याचं आगमन
  • माणिकराव कोकाटेंसंदर्भात महत्वाची अपडेट, प्रकृती स्थिर असल्यास अटकेची शक्यता; वरिष्ठांशी सल्लामसलत करून नाशिक पोलिस निर्णय घेणार
  • माणिकराव कोकाटेंची प्रकृती बिघडली? अँजिओग्राफीसाठी नेलं, रुग्णालयात कोकटेंची मुलगी अन् पत्नी उपस्थित
 जिल्हा

उरण नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत उरण शहरात रूट मार्च.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    20-12-2025 10:40:48

 उरण : उरण नगरपरिषद निवडणुक निकालाच्या अनुषंगाने दिनांक २१/१२/२०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ५:३०  वा.चे दरम्यान उरण शहरामध्ये रूट मार्च वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.सदर रूट मार्च उरण एसटी स्टँड चार फाटा, येथून सूरू होऊन पालवी हॉस्पिटल, कामठा रोड, एन आय हायस्कूल समोरून स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, राजपाल नाका मार्गाने उरण कोटनाका येथे समाप्त करण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाणे कडील पोनि (प्रशासन) संजय जोशी, ०२ सपोनि/ पोउपनिरी, २० पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय येथील क्यूआरटी पथकाचे १ अधिकारी १२ पोलीस अंमलदार व आरसीपी पथकाचे ०१ अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.उरण शहरात कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती