सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 जिल्हा

दिघोडे येथे पारंपारिक कोळी समाज मच्छिमार वि. का. स. संस्था मर्यादित, दिघोडे ची स्थापना.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    22-12-2025 17:55:47

उरण : रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी उरण तालुक्यातील दिघोडे कोळीवाडा येथे "पारंपारिक कोळी समाज मच्छिमार वि. का. स. संस्था मर्यादित, दिघोडे" या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठया उत्साहात पार पडला.

गोर गरीब कोळी बांधवांचे प्रश्नी मार्गी लागावे व शासनाच्या अनेक सुविधांचा लाभ कोळी बांधवांना मिळावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना केल्याचे संस्थेचे चेअरमन अशोक कोळी आणि सेक्रेटरी  प्रितेश कोळी यांनी सांगितले. स्वर्गीय केशव बुधाजी नाखवा सभागृहात पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक रमेश भास्कर कोळी, सीताराम जनार्दन नाखवा, महेंद्र हरिश्चंद्र चोगले, दिघोडे ग्रामपंचायतचे सरपंच  किर्तिनिधि हसुराम ठाकुर, उपसरपंच कैलास अंबाजी म्हात्रे उपस्थित होते.मार्गदर्शकांनी कोळी समाजाचा इतिहास व सद्य परिस्थिती यावर मार्गदर्शन करत उपस्थित कोळी बांधवांना संबोधित केले.या कार्यक्रमासाठी अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोहाकोळीवाडा सोसायटीचे चेअरमन गोविंद कोळी, गव्हाण सोसायटीचे चेअरमन हितेश कोळी, मोठीजुई सोसायटीचे चेअरमन माणिक कोळी तसेच आयोजक, संस्थेचे खजीनदार राजाराम कोळी, सदस्य तुकाराम नाखवा, हरिश्चंद्र नाखवा, हिराजी नाखवा, जयश्री नाखवा,धनवंती कोळी,रेश्मा कोळी, विजय कोळी, हरेश कोळी, तसेच दिघोडे गावातील नागरिक, डि डि कोळी के.डी कोळी, दत्ता कोळी आणि इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकपर मनोगत प्रितेश काशीनाथ कोळी यांनी केले तर समारोप संस्थेचे चेअरमन अशोक जनार्दन कोळी यांनी मान्यवरांचे आभारपर मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची समाप्ती केली.


 Give Feedback



 जाहिराती