सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 शहर

“अल्पसंख्याक हक्क दिवस” साजरा केल्याबद्दल प्रशासनाचे आभार ;इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप' ची भूमिका

डिजिटल पुणे    23-12-2025 15:49:53

पुणे : पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'अल्पसंख्याक हक्क दिवस' पुणे जिल्ह्यात साजरा करण्यात आल्याबद्दल 'इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप, पुणे' या सामाजिक संस्थेने  समाधान व आनंद व्यक्त केला आहे. संस्थेतर्फे मागील पाच वर्षे याबाबत सतत मागणी केली जात होती. 

पुणे जिल्हाधिकारी व प्रशासनाने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका महाराष्ट्र व देशासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.'इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप 'चे  संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी प्रशासनाचे आभार मानत भविष्यातही संविधान, समानता व मानवाधिकार यासाठी सहकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे,संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की,हा निर्णय पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण, शांततामय व संविधानिक जनआंदोलनाचा सकारात्मक परिणाम आहे.अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत अधिकारांची जाणीव, सामाजिक समता व लोकशाही मूल्यांचे संवर्धन या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.संस्थेचे प्रतिनिधी म्हणाले की— “हा दिवस कोणत्याही एका समाजाचा नाही,तर भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय आहे.”


 Give Feedback



 जाहिराती