सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 DIGITAL PUNE NEWS

रूममध्ये झाडू मारण्यास नकार दिल्याने ११वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार

डिजिटल पुणे    23-12-2025 18:22:51

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात रॅगिंगचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार जणांनी खोलीत घुसून तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असून त्याच्यावर सध्या धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, रूम स्वच्छ करणे आणि झाडू मारण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चार विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने खोलीत प्रवेश करून स्टम्पने मारहाण केली. “तब्बल तीन तास मला छळण्यात आले,” असा आरोप त्याने केला आहे.

या घटनेला आणखी गंभीर वळण देणारा आरोप म्हणजे, यापूर्वीही महाविद्यालयात असे प्रकार घडल्याचा दावा पीडिताने केला आहे. तसेच “महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषी विद्यार्थ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती