सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 जिल्हा

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल पुणे    24-12-2025 15:15:31

मुंबई : भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आवश्यक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना करत, महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, भूमी अभिलेख विभागाकडील भू-करमापक पदाच्या वेतनश्रेणीबाबत केलेल्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळस्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी  संवर्गात ज्या प्रमाणे प्रवास भत्ता दिला जातो त्या प्रमाणे प्रवास भत्ता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, आकृतीबंध, अनुकंपा भरती, सरळसेवा भरती,  कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेवाज्येष्ठता यादी याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात विभागाने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


 Give Feedback



 जाहिराती