सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 जिल्हा

न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

डिजिटल पुणे    25-12-2025 10:29:24

मुंबई : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यू तोतलाडोह गावाचे विस्थापन झाल्याचे सांगून राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, वाडंबा येथे विस्थापित झालेल्या या गावाला कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. आर्थिक मोबदला घेऊन त्यांना फक्त जमिनी दिल्या आहेत. त्यांना नागरी सुविधा देणे गरजेचे आहे. कायद्यानुसार त्यांना सुविधा देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.

दरम्यान, यावेळी सांगली जिल्ह्यातील कणेगाव या पूर बाधित गावच्या पुनर्वसनविषयही बैठक घेण्यात आली. त्यावेळी कालबद्ध कार्यक्रम आखून हा प्रश्न मार्गी लावावा. गावठाणातील  जुन्या जागेचा  रहिवासी वापर करता येणार नाही या अटींवर जागेची मालकी मूळ मालकाकडे ठेवण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव द्यावा. ज्यांनी पैसे भरले आहेत व स्थलांतरासाठी तयार आहेत त्यांना जागा वाटपाचे काम एक महिन्यात पूर्ण करावे अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती