सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग; बॉलिवूड निर्माते संदीप सिंह थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडे–विकी जैन यांचा मदतीचा हात
  • नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला, सब इनस्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौर आणि स्थायी समिती हवी; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
  • राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार
 DIGITAL PUNE NEWS

खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, शहरात खळबळ

डिजिटल पुणे    26-12-2025 15:02:53

खोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 7 वाजता मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आले होते. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत.

ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोपोली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.हल्लेखोरांना अटक झाल्यानंतरच या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती