सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग; बॉलिवूड निर्माते संदीप सिंह थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडे–विकी जैन यांचा मदतीचा हात
  • नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला, सब इनस्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौर आणि स्थायी समिती हवी; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
  • राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी: मुंबई मनपासाठी राज ठाकरेंचा पहिला मोहरा ठरला; वॉर्ड 192 मधून यशवंत किल्लेदार उमेदवार

डिजिटल पुणे    26-12-2025 15:18:17

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून ठाकरे बंधूंच्या युतीतून राज ठाकरे यांनी पहिला मोहरा पुढे केल्याची माहिती समोर आली आहे. दादर परिसरातील मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 192 हा युतीच्या जागावाटपात मनसेला देण्यात आला असून, या वॉर्डमधून मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत याच वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या.

वॉर्ड 192 वरून ठाकरे गटात नाराजी

वॉर्ड क्रमांक 192 मनसेकडे दिल्यामुळे ठाकरे गटात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. युतीतील तडजोडीनुसार वॉर्ड 192 मनसेला तर वॉर्ड 194 ठाकरे गटाला देण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र वॉर्ड 192 आपल्यालाच मिळावा, यासाठी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांच्यासह शिवसैनिक आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक 2026 – महत्त्वाची माहिती

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

एकूण प्रभाग : 227

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला : 7 मार्च 2022

सध्या प्रशासन प्रशासकांकडे

मागील निवडणूक : 2017

त्या वेळी महापौर : किशोरी पेडणेकर (शिवसेना)

मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम 2026

नामनिर्देशन : 23 ते 30 डिसेंबर

छाननी : 31 डिसेंबर

उमेदवारी मागे घेणे : 2 जानेवारी 2026

अंतिम यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026

मतदान : 15 जानेवारी 2026

निकाल : 16 जानेवारी 2026

2017 चा पक्षीय बलाबल (227 नगरसेवक)

शिवसेना – 84

भाजप – 82

काँग्रेस – 31

राष्ट्रवादी काँग्रेस – 9

मनसे – 7

समाजवादी पक्ष – 6

एमआयएम – 2

अपक्ष – 5


 Give Feedback



 जाहिराती