सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग; बॉलिवूड निर्माते संदीप सिंह थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडे–विकी जैन यांचा मदतीचा हात
  • नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला, सब इनस्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौर आणि स्थायी समिती हवी; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
  • राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार
 जिल्हा

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    27-12-2025 10:46:24

मुंबई  : ‘मिशन लक्ष्यवेध’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या खेळांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र  सुरू करण्यात येत आहे. यासाठी अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती व शूटिंग या खेळांचे इच्छुक प्रशिक्षक (एनआयएस / लेव्हल कोर्स व आवश्यक प्रमाणपत्रधारक) यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.तसेच, एखादी संस्था आपल्या संस्थेमध्ये हे केंद्र चालविण्यास इच्छुक असल्यास त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

ऑलिम्पिक व जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना यशस्वी करण्याच्या उद्देशाने राज्यभर त्रिस्तरीय क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था उभारण्यात येत आहे. यामध्ये राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. या केंद्रांमध्ये प्रत्येक खेळासाठी मर्यादित २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स सायन्स सुविधा, वैद्यकीय उपचार, विमा संरक्षण, पूरक आहार तसेच देशांतर्गत स्पर्धांचा खर्च शासनामार्फत देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती