पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘कृष्ण-कृष्ण’ हा स्वराविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता)येथे होणाऱ्या या कार्यक्रमात 'कृष्ण रसगान आणि कृष्ण रसपान' या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना,काव्य आणि संहिता डॉ. शुभांगी शिरढोणकर(इंदूर) यांची असून संगीत दिग्दर्शन जीवन धर्माधिकारी यांचे आहे.स्वर सादरीकरण जितेंद्र अभ्यंकर ,स्वरदा गोखले-गोडबोले करणार असून सूत्रसंचालन प्रवीण शर्मा करणार आहेत.
सांस्कृतिक रसिकांसाठी हा कार्यक्रम एक अनोखा आध्यात्मिक आणि सांगीतिक अनुभव ठरणार असून सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७१ वा कार्यक्रम आहे.