पुणे :पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल करत आहेत.लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरने आज पोलिस यंत्रणेसह पुण्यात दाखल झाल्या. या दोघीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आज आंदेकर कुटुंबाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज दाखल केल्याने पुण्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
बंडू आंदेकर यांच्यासह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे.
पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल
न्यायालयाच्या आदेशानुसार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना कोल्हापूर कारागृहातून पुण्यात आणण्यात आले. या दोघींनी तोंड स्कार्फने झाकून पोलीस सुरक्षेत उमेदवारी अर्ज दाखल केला.
बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीत
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लक्ष्मी आणि सोनाली यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर काही वेळातच बंडू आंदेकर यांनाही पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यासाठी आणले जाणार असल्याची माहिती आहे.
प्रभाग वाटपाची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार,
बंडू आंदेकर – प्रभाग क्रमांक २२
लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर – प्रभाग क्रमांक २३
या प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हत्या प्रकरणातील आरोपी असतानाही न्यायालयीन परवानगीने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे आंदेकर कुटुंब पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे