सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
  • एकनाथ शिंदे काळोखेंच्या घरात मांडी घालून बसले, कुटुंबीय धाय मोकलून रडलं, शिंदे म्हणाले, या केसवर माझं लक्ष, ठेचून काढू!
  • तोंडावर काळं कापड, हातात साखळी अन् व्हिक्ट्री साईन; गुंड बंडू आंदेकरची खूंखार एन्ट्री, जेलमधून बाहेर येऊन पुण्यात अर्ज भरला
  • मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
 DIGITAL PUNE NEWS

नागपुरातील हृदयद्रावक घटना !आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीला अलगद उचललं; अंधारात नेत प्राणांनी शरीराचे लचके तोडले, छातीसह दोन्ही हात...;

डिजिटल पुणे    27-12-2025 16:57:30

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा परिसरातुन एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात परिसरातील स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा असून ती मूळची मध्यप्रदेशातील सेलमिया येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही घटना 26 डिसेंबरच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

प्राण्याने शरीराचे लचके तोडले, छाती व दोन्ही हात खाल्ले

मिळालेल्या माहितीनुसार, घरात मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, परिसरातच छिन्नविछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 6 ते 8 महिन्यांची ही चिमुकली आईच्या कुशीत झोपडीत झोपलेली असताना अज्ञात प्राण्याने तिला उचलून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर अज्ञात प्राण्याने शरीराचे लचके तोडले असून छाती व दोन्ही हात खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने घटना घडल्याची माहिती

दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, याचा शोध अद्याप सुरू आहे. ठेकेदाराच्या कामासाठी बाहेरगावाहून आलेले मजूर कुटुंबासह या झोपडपट्टीत वास्तव्यास असताना हि घटना घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून मजूर कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. तर आता सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होते आहे.


 Give Feedback



 जाहिराती