सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 व्यक्ती विशेष

मुंबई महापालिका निवडणूक 2026 : भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर;ठाकरेंविरोधात तगडे उमेदवार!

डिजिटल पुणे    29-12-2025 11:22:52

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाने पहिली 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, शिवसेना (ठाकरे गट) विरोधात भाजपाने आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही उमेदवारी देण्यात आली असून ते धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार आहेत.

राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपाची मुंबई महापालिकेसाठी पहिली उमेदवार यादी (66 नावे)

वॉर्ड 2 – तेजस्वी घोसाळकर

वॉर्ड 7 – गणेश खणकर

वॉर्ड 10 – जितेंद्र पटेल

वॉर्ड 13 – राणी त्रिवेदी

वॉर्ड 14 – सीमा शिंदे

वॉर्ड 15 – जिग्ना शाह

वॉर्ड 16 – श्वेता कोरगावकर

वॉर्ड 17 – शिल्पा सांगोरे

वॉर्ड 19 – दक्षता कवठणकर

वॉर्ड 20 – बाळा तावडे

वॉर्ड 23 – शिवकुमार झा

वॉर्ड 24 – स्वाती जैस्वाल

वॉर्ड 31 – मनिषा यादव

वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा

वॉर्ड 37 – प्रतिभा शिंदे

वॉर्ड 43 – विनोद मिश्रा

वॉर्ड 46 – योगिता कोळी

वॉर्ड 47 – तेजिंदर सिंह तिवाना

वॉर्ड 52 – प्रीती साटम

वॉर्ड 57 – श्रीकला पिल्ले

वॉर्ड 58 – संदीप पटेल

वॉर्ड 59 – योगिता दाभाडकर

वॉर्ड 60 – सयाली कुलकर्णी

वॉर्ड 63 – रुपेश सावरकर

वॉर्ड 68 – रोहन राठोड

वॉर्ड 69 – सुधा सिंह

वॉर्ड 70 – अनिश मकवानी

वॉर्ड 72 – ममता यादव

वॉर्ड 74 – उज्ज्वला मोडक

वॉर्ड 76 – प्रकाश मुसळे

वॉर्ड 84 – अंजली सामंत

वॉर्ड 85 – मिलिंद शिंदे

वॉर्ड 87 – महेश पारकर

वॉर्ड 97 – हेतल गाला

वॉर्ड 99 – जितेंद्र राऊत

वॉर्ड 100 – स्वप्ना म्हात्रे

वॉर्ड 103 – हेतल गाला मार्वेकर

वॉर्ड 104 – प्रकाश गंगाधरे

वॉर्ड 105 – अनिता वैती

वॉर्ड 106 – प्रभाकर शिंदे

वॉर्ड 107 – नील सोमय्या

वॉर्ड 108 – दिपिका घाग

वॉर्ड 111 – सारिका पवार

वॉर्ड 116 – जागृती पाटील

वॉर्ड 122 – चंदन शर्मा

वॉर्ड 126 – अर्चना भालेराव

वॉर्ड 127 – अलका भगत

वॉर्ड 129 – अश्विनी मते

वॉर्ड 135 – नवनाथ बन

वॉर्ड 144 – बबलू पांचाळ

वॉर्ड 152 – आशा मराठे

वॉर्ड 154 – महादेव शिगवण

वॉर्ड 172 – राजश्री शिरोडकर

वॉर्ड 174 – साक्षी कनोजिया

वॉर्ड 185 – रवी राजा

वॉर्ड 190 – शितल गंभीर देसाई

वॉर्ड 195 – राजेश कांगणे (वरळी)

वॉर्ड 196 – सोनाली सावंत

वॉर्ड 207 – रोहिदास लोखंडे

वॉर्ड 214 – अजय पाटील

वॉर्ड 215 – संतोष ढोले

वॉर्ड 218 – स्नेहल तेंडुलकर

वॉर्ड 219 – सन्नी सानप

वॉर्ड 221 – आकाश पुरोहित

वॉर्ड 226 – मकरंद नार्वेकर

वॉर्ड 227 – हर्षिता नार्वेकर

मुंबई महापालिका निवडणूक 2026 : कार्यक्रम

नामनिर्देशन: 23 ते 30 डिसेंबर

छाननी: 31 डिसेंबर

मागे घेणे: 2 जानेवारी 2026 पर्यंत

अंतिम यादी व चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026

मतदान: 15 जानेवारी 2026

मतमोजणी/निकाल: 16 जानेवारी 2026

2017 मधील पक्षीय बलाबल (227 जागा)

शिवसेना – 84

भाजप – 82

काँग्रेस – 31

राष्ट्रवादी काँग्रेस – 9

मनसे – 7

समाजवादी पक्ष – 6

एमआयएम – 2

अपक्ष – 5

भाजपाच्या पहिल्या यादीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून, येत्या दिवसांत इतर पक्षांच्या याद्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती