सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 व्यक्ती विशेष

पुणे महानगरपालिका निवडणूक : आम आदमी पार्टीकडून प्रभाग क्र. ३८ मधून प्रशांत कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डिजिटल पुणे    29-12-2025 17:01:52

पुणे  : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने लोकशाहीचा उत्सव नागरिकांपासून दूर राहिला होता. आता ही निवडणूक म्हणजे लोकशाही पुनःस्थापनेचा महत्त्वाचा टप्पा असून मतदार राजाचा सन्मान जपण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे, असे मत पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.

लोकशाही टिकवण्यासाठी आणि पारदर्शक, जनहिताचे प्रशासन देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ — बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज येथून प्रशांत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात दाखल केला.

यावेळी कोणताही गाजावाजा न करता, नागरिकांना कुठलाही त्रास होऊ न देता हा अर्ज सादर करण्यात आला. राजकारणात प्रामाणिकपणे कार्यरत असल्यामुळे आणि लोकसेवेवर ठाम विश्वास असल्याने कुटुंबीयांनीही ठामपणे पाठीशी उभे राहत उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत कांबळे यांना साथ दिली.हा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमकर तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा भुतकर, सुरेखा भणगे व नीलम शिंगाडे यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.

मतदार राजाचा सन्मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेप्रमाणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांनुसार विकासकामे केली जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.स्थानिक पातळीवरील पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असेही प्रशांत कांबळे यांनी स्पष्ट केले.पुणे शहरात बदलाची लाट असून विजय हा नक्कीच आम आदमी पार्टीचाच होणार, असा ठाम विश्वास यावेळी प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती