सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
  • सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 क्राईम

वर्धा–नागपूर रोडवर भीषण अपघात; ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, तिघांचा मृत्यू, 25 जखमी

डिजिटल पुणे    30-12-2025 12:07:37

नागपूर :  नागपूर–वर्धा महामार्गावर जुनापाणी गावाजवळ आज (30 डिसेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव प्रवासी ट्रॅव्हल्सने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर 25 प्रवासी गंभीर ते किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तसेच काहींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

प्राथमिक तपासात अतिवेग, चालकाला डुलकी येणे किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकची दृष्टीआड स्थिती ही संभाव्य कारणे मानली जात आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती