सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

पुण्यात मोठी राजकीय घडामोड, कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात

डिजिटल पुणे    30-12-2025 12:33:12

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. जयश्री मारणे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवणार असून, आज त्यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आहे.

 कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री मारणे निवडणूक लढवणार असून, आज त्यांना अधिकृत एबी फॉर्मही देण्यात आला आहे.

पुण्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर अजित पवार यांनी यापूर्वी अनेक वेळा कठोर भूमिका घेतली होती. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी पुणे पोलिसांना वेळोवेळी स्पष्ट सूचना दिल्याचेही दिसून आले आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाकडून एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.या निर्णयामुळे अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, आगामी निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे अजित पवार गटाच्या गुन्हेगारीविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विरोधकांकडूनही यावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती