सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 जिल्हा

बारामती येथे अस्मिता हिप्नोथेरपी अ‌ॅंड आउन्सलिंग सेंटरच्या वतीने ग्लाेरी अचीव्हमेंट पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    30-12-2025 17:33:26

उरण : उरण तालुक्यातील नवघर गावचे डॉ. हेमंत रामचंद्र कडू यांना "ग्लोरी अचीव्हमेंट पुरस्कार सोहळा २०२५", या गौरवपूर्ण कार्यक्रमात संमोहन रत्न २०२५ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.सामाजिक,राजकीय, शैक्षणिक त्याचप्रमाणे उत्तम असे कार्य करणा-या अनेक व्यक्तींना संमोहन तज्ञ डाॅ.विजय कुमार काळे आणि डाॅ.रविकुमार काळे यांनी पुरस्कार प्रदान केले.हा पुरस्कार नि:शुल्क होता.त्याच्या या कार्यातून डाॅ.विजयकुमार काळे,दिशा काळे आणि डा‌ॅ.रविकुमार काळे,अश्विनी काळे यांची सामाजिक प्रगतीसाठी धडपड दिसून येत असून ते सदैव इतरांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात हे प्रयत्न त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून आले .त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे हा पुरस्कार प्रत्येक व्यक्तीचा विचार करून त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी तसेच योग्य दिशा प्राप्त व्हावी हाच उद्देश त्या मागचा असून समाजाची प्रगती व्हावी हिच धडपड आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणेडाॅ.अरूण अडसूळ(माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी(पोलिस इन्पेक्टर बारामती शहर), निलेश पांडूरंग माने(पोलिस निरीक्षर ट्राॅफिक ब्रांच(बारामती शहर),सुमित सुनावणे (पत्रकार lBN लोकमत),आरती ताई गव्हाळे(शेंडगे) (समाजसेविका),अ‌ॅड.राहूल सोनवणे(सहाय्यक सरकारी अभियोक्ता) इत्यादि प्रमुख पाहूणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ.विजयकुमार काळे आणि डाॅ.रविकुमार काळे यांनी भुषविले,आशा शिरतोडे,रूपाली झारगड,योगेश नालंदे,डाॅ.पुजा साळूंखे,प्रथमेश मिशाळ,डाॅ.हेमंत कडू ,प्रताप वाघमोडे,पुजा शेंदरकर,दिपक काळे,रेणुका राठोर,अनिकेत इनामके,अक्षय माने,किरण पवार,दिपक जाधव,दिपाली निंबाळकर,रविंद्र चव्हाण,समीर बनकर,अक्षय मांडगे,संतोष जगदाडे,संगीता वाघ,डाॅ.स्नेहल निंबाळकर,डा‌ॅ.स्नेहल टेकाळे,मनिषा लहाने,मनोज वाबळे इत्यादींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगीता वाघ यांनी तर  आभार अश्विनी जाधव यांनी केले.तसेच टीम मधील आम्रपाली धेंडे,समृध्दी भोरडे,रोशनी संत आणि कुमार शिवशरण यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती