सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 जिल्हा

उरण तालुक्यातील शिक्षकांचे तंबाखू मुक्त शाळा विषयी प्रशिक्षण संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    31-12-2025 10:30:11

उरण : ग्रामीण रुग्णालय उरण, शिक्षण विभाग पंचायत समिती उरण , सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती उरण येथे संपन्न झाले. सदर प्रशिक्षण साठी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालय उरणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बाबासो काळेल, गटशिक्षणाधिकारी श्रीमती निर्मला घरत तर प्रशिक्षण साठी मार्गदर्शक सलाम मुंबई फाउंडेशनच्या श्रीमती सारिका ब्राऊन,दंत शल्यचिकित्सक डॉ.संतोष झापकर अणि जिल्हा रुग्णालय अलिबाग च्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमचे  सुशील साईकर हे उपस्थित होते. तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याने बर्‍याचदा उपचार घेण्यासाठी रूग्णांना दूरवर जावे लागते त्यामुळे आर्थिक अणि मानसिक त्रास होतो. यासाठी या कार्यशाळेतून शिक्षकांनी मुलांना आयुष्यभर तंबाखू अणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यासाठी निश्चिंतपणे मदत होईल तसेच समाजात जनजागृती होईल असे डॉ काळेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले . तर तंबाखूचे दुष्परिणाम अणि त्यामुळे होणारे कॅन्सर तसेच कोटपा कायदा २००३ याविषयी सविस्तर माहिती डॉ झापकर यांनी दिली. तर तंबाखू मुक्त शाळा याचे महत्व अणि ९  निकष याच्या विषयी समर्पक माहिती सलाम मुंबईच्या श्रीमती सारिका मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील साईकर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर अणि शिक्षकांचे आभार केंद्र प्रमुख म्हात्रे सर यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती