पुणे : आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करीत असतांना एकत्र कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. याचा गांभीर्याने .विचार करावाच लागेल.येणार्या वीस पंचवीस वर्षांत नसुन येत्या 2035 वर्षात आपल्या घरातील काही नाती ही कायम साठी संपणार आहेत.विसावे शतक संपत असतांना एकविसाव्या शतकात भयंकर काही घडणार आहे असे सांगणारे संत बाबा,महाराज,ज्योतिषी खूप भविष्यवाणी करत होते.२०२२/२०२३ करोंनाने जगात कसा धुमाकूळ घातला होता.त्यामुळे भावाला वैरी समजणारा भाऊ,आणि अनेक कुटुंबातील संपलेले नाते नव्याने जोडल्या गेले होते.त्यात दादा, वहीनी,दीर,छोटी जाऊ,मोठा भाऊ जेठ,मोठी जेठानी जाऊ, काका,काकी,नणंद,नंदई,आत्या,मामा,मावशी,मावसा,(काका),ताई,दाजी या सहीत अनेक नाती आमच्या घरातून संपलेली नाती जोडले गेले होते.आता २०३५ पर्यन्त ती आचारणातून संपण्याची सुरुवात झाली आहे.
सुशिक्षित,उच्चशिक्षित पदवीधर मुली आपल्या मानसिकते मुळे फक्त अडीच तीन माणसांचा परीवार शिल्लक ठेवणार आहेत.त्यांना हिंमत देणारा मोठा भाऊ नको आहे.ना हुशार,चुणचुणीत असा छोटा भाऊ नको आहे.आणि सासू सासरे तर बिलकुल नको आहेत. ही शिकवण उच्च शिक्षित आई वडिलांची न्यायमूर्ती असणाऱ्या माणसांची असेल तर एकत्र कुटुंब व्यवस्थेत कोण असणार आहे?.म्हणूनच मी लिहत आहे की एकत्र कुटुंब व्यवस्था संपणार आहे?.
एकत्र कुटुंब व्यवस्थेत काय असते?. घरात वहीनी असते,कोणी छोटा दीर असतो,सूना सुद्धा असतात,तिला कोणी जाऊ असतात,कोणी खट्याळ नणंद असतात,चलाख, चपळ आत्या असतात.आता नवीन काय?.एकूणच काय तर,एकच मुल ही फॅशन आणि फक्त मी मी पणाची मूर्खता आणि अज्ञानता स्पष्टपणे दिसत आहे.त्यात परीवार संपत आहेत.दोन भावांचे परीवार सुद्धा आता शेवटच्या टप्प्यावर आहेत.आधी मातीच्या कच्च्या घरात सुद्धा मोठमोठे परीवार राहात होते.आता मोठमोठ्या बंगल्यात केवळ अडीच तीन राहाण्याची फॅशन आली आहे. हे सर्व पाहून मनाला फारच वेदना होत आहेत.या अशा परिस्थितीत आम्ही एकुलत्या एका मुलावर काय काय जबाबदारी देऊ शकतो.त्याला कठीण प्रसंगी बळ,हिंमत कोण देणार?. भाऊ नसल्यावर त्याच्या खांद्यावर मदतीचा हात कोण ठेवणार?. म्हणजेच की एकत्र कुटुंब व्यवस्था संपणार आहे?.
आपली लोकसंख्या कमी का होत आहे.आपली कमी होत असलेली लोकसंख्या हा एक चिंतेचा विषय होत आहे.आपल्याला आपली मानसिकता बदलावाच लागणार आहे.कशी ते पहा मुलगी व मुलगीचे आई वडील मुलगा पाहतांना त्याला सरकारी नोकरी पाहिजे,स्वतचा टू बी एच के पाहिजे.फोरव्हीलर गाडी पाहिजे.घरात भाऊ, बहीण,सासू सासरे नको आहेत. या अटी पूर्ण करणार मुलगा मिळत नाही त्यात मुलीचे व मुलांचे वय वाढत जाते.एकतर व्यसन लागते,एकलकोंडया स्वभाव,विचार करण्याची मानसिकता पूर्णपणे बदलते यात ३२ ते ३८ वय होते. तडजोड करून लग्न झाले तर पुढे ते टिकेल याची हमी नसते.मग मूल जन्मा येण्याचा प्रश्नच येत नाही.म्हणूनच मी लिहत आहे की एकत्र कुटुंब व्यवस्था संपणार आहे?.पूर्वी १८ ते २० वयात मुलामुलीचे लग्न केले जात होते.घर,स्वभाव,खानदान पाहिले जात होते.ग्रामीण भागातील मूलमुली शेतात कष्टाची कामे करून सुखाने संसार करतात आणि आई वडिलांना सांबाळतात.उच्चशिक्षित पदवीधर मूल,मुली स्वताचे विकास आई,वडिलांना लांब किंवा वृद्धाश्रमात ठेवतात.म्हणूनच मुलांच्या लग्नाचे वय २० ते २४ पर्यंत निश्चित केले पाहीजे.घरदार,खानदान,स्वभाव आणि सामाजिक बांधिलकी,लोक लज्जा असणारी मानसिकता पाहिली पाहिजे.ते न पाहता केवळ सरकारी नोकरी, स्वतचा टू बी एच के,फोरव्हीलर गाडी पाहून लग्न केले तर सुख,समाधान,जिव्हाळा जास्त काळ टिकत नाही.म्हणूनच एकत्र कुटुंब व्यवस्था पण टिकत नाही.
उच्चशिक्षित पदवीधर मूल,मुली त्यांचे आई वडील सेटल होण्याच्या मानसिकता ठेऊन किंवा नादात मुलामुलीचे वय ३० ते ३५ पर्यंत ढकलले जात आहे. यातच जवळ जवळ एका पिढीचे अंतर पडत आहे. उच्चशिक्षित पदवीधर मूल,मुली सेटल होऊन यशस्वी होतात,पण तोपर्यंत वयात असणारा हुरुप व अर्धे आयुष्य निघून गेलेले असते.वयामुळे विचार करण्याची मानसिकता बदलत जाते. कोणी बोलणारा विचारणारा राहत नाही. हे शल्य कुठे तरी जाणवते.पण बोलता येत नाही. एकत्र कुटुंब असते तर सर्वच हक्काने सांगता,बोलता आले असते. आज ती एकत्र कुटुंब समाज व्यवस्था कोण संपवत आहे?.
गावात गावकी आणि भावकी सर्व सुख दुखात सहभागी असते,काही उत्सव सर्वांना एकत्र आणण्यासाठीच असतात.हे उच्चशिक्षित पदवीधर मूल,मुली हम दो हमारा एक च्या नादात विसरत चालले आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे "हम दो...हमारा एक" अशी कुटुंब व्यवस्था केल्यामुळे.गावी कोण लक्ष देणार,मग गावचे घर बंद.सणा सुदीला सुद्धा जायला मिळेल की नाही.याची खात्रीच देता येत नाही.कारण इकडे मुंबईला "हम दो" हे कामावर असणार व "हमारा एक" हा स्वतःच्या करिअर मध्ये गुंतलेला असणार त्याला गावकी भावकीचे महत्व कसे कळणार?.
देशात आधुनिक तत्वज्ञान झपाट्याने येत असले तरी हे एक विदारक सत्य नाकारता येत नाही.म्हणून आपली कुटुंब वाढली पाहिजेत.कोणाला पटो अथवा न पटो.पण आपल्या पूर्वज यांनी जी एकत्र कुटुंब व्यवस्था अवलंबीली होती ना.तीच शंभर टक्के बरोबर होती.उच्चशिक्षित पदवीधर मूल,मुलीनी त्यांच्या आई वडिलांनी आपली मानसिकता बदली करून मैत्री भावना वाढवली पाहिजे. समाजात सामाजिक बांधिलकी ठेऊन वागळे पाहिजे. तरच एकत्र कुटुंब समाज व्यवस्था संपणार नाही.२०२५ संपले कसे कळले नाही.पण २०२६ कसे असावे हे आपण एकत्र बसून ठरवले पाहिजे.अन्यता सर्वच दिवस सारखेच असणार आहेत.नवीन वर्षात एकत्र कुटुंब समाज व्यवस्था संपणार नाही तर ती निर्माण होण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे.हीच अपेक्षा ठेवून नवीन वर्षाच्या सर्व लोकप्रिय दैनिकाच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा देतो.व थांबतो.