पुणे : महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मनपाकडून देण्यात येणाऱ्या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच एन ओ सी NOC प्रक्रियेची पद्धत, तिची वैधता तसेच सर्व उमेदवारांसाठी समान निकष लावले जात आहेत का, याबाबत लोकहिताच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुप ची या सामाजिक संघटनेचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व संविधानसम्मत राहावी यासाठी त्यांनी या विषयावर माहिती अधिकार अर्ज दाखल केला असून, निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप, जिल्हाधिकारी यांना घटनात्मक स्मरणपत्र तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार सादर केली आहे.
ही भूमिका कोणत्याही व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 आणि 243ZA नुसार स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका होणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने या विषयावर वस्तुनिष्ठ, स्पष्ट आणि वेळेत स्पष्टीकरण द्यावे, जेणेकरून नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.