मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ची महायुतीत अधिकृत एन्ट्री झाली आहे. रिपाइंने मुंबईत तब्बल 39 उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीकडून रिपाइंला एकूण 12 जागा सोडण्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनीच ही माहिती दिली. ठरलेल्या सूत्रानुसार भाजप 6 आणि शिवसेना (शिंदे गट) 6 जागा रिपाइंसाठी सोडणार आहेत.
मुंबईतील जागावाटपाचे गणित
भाजप : 131 जागा
शिवसेना (शिंदे गट) : 84 जागा
रिपाइं (आठवले गट) : 12 जागा
यापूर्वी मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागांवर लढत होती. मात्र दोन जागांवर एबी फॉर्मचा घोळ झाल्याने त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार नाही.
नाराजीनंतर वाटाघाटींना यश
प्राथमिक जागावाटपात रिपाइंला स्थान न मिळाल्याने रामदास आठवले नाराज झाले होते. त्यांनी थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. या भेटीनंतरच रिपाइंसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरित उमेदवार अपक्ष लढणार
रिपाइंने मुंबईतून जवळपास 39 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 12 उमेदवारांना महायुतीचे अधिकृत एबी फॉर्म मिळणार असून, उर्वरित उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. अंतिम यादी आणि एबी फॉर्मबाबतची स्पष्टता उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
रिपाइं (आठवले गट) – मुंबईतील प्रमुख उमेदवार
वॉर्ड 186 – स्नेहा सिद्धार्थ कासारे
वॉर्ड 188 – रॉबिनसन मारन नायागाम
वॉर्ड 181 – बापूसाहेब योहान काळे
वॉर्ड 200 – सचिनभाई मोहिते
वॉर्ड 146 – रमेश शंकर सोनावणे
वॉर्ड 152 – दिक्षा गायकवाड
वॉर्ड 155 – ज्योती जेकटे
वॉर्ड 147 – प्रज्ञा सदाफुले
वॉर्ड 153 – संजय डोळसे
वॉर्ड 154 – संजय इंगळे
वॉर्ड 198 – निलिमा मानकर
वॉर्ड 210 – गणेश वाघमारे
वॉर्ड 223 – विनोदकुमार साहू
वॉर्ड 214 – मनोहर कुलकर्णी
वॉर्ड 150 – शिल्पा बेलमकर