सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 शहर

संविधान ग्रुप व रिपब्लिकन पार्टी (आय) चा भोजन , समाजप्रबोधन,वैद्यकीय सेवा उपक्रम ;भीमा कोरेगाव येथे यशस्वी आयोजन

डिजिटल पुणे    01-01-2026 17:34:44

पुणे : संविधान ग्रुप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) यांच्या संयुक्त विद्यमाने १ जानेवारी २०२६ रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त आलेल्या अनुयायांसाठी  भोजन व विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार नागरिकांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रबोधन भवन, टोल नाक्याजवळ भोजन व पिण्याच्या पाण्याची मोफत  व्यवस्था करण्यात आली होती.

या वेळी सभा, समाजप्रबोधनपर कार्यक्रम तसेच भीम गीतांच्या गायनाचे,मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. संविधान ग्रुपचे संस्थापक राकेश सोनवणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. कार्यक्रमाचे उद्घाटन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचे संयोजक भन्ते विनयचार्य यांच्या हस्ते संपन्न झाले.

संविधान ग्रुपचे पुणे शहर अध्यक्ष सागर आडगळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण सोनवणे, महाराष्ट्राचे सरचिटणीस तेजस पटेकर, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विवेक मांडेकर, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सागर जगताप, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुदस्सर शेख तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर सपकाळ, पुणे शहर अध्यक्ष चैतन्य साखळे, जिल्हाध्यक्ष शंभू कांबळे, जिल्हा महासचिव रोहित परदेशी, खडकवासला विधानसभा अध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत १ जानेवारी रोजी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. पोलीस आयुक्तालयाच्या वतीनेही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेकडून संघटनेच्या मागणीनुसार भीमा कोरेगाव परिसरात आठ ते नऊ हजार शौचालयांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, पाण्यासाठी लागणारे ग्लासेस तसेच वैद्यकीय दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हा संपूर्ण उपक्रम शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती