सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

शिंदेंच्या शिवसेनेतही घराणेशाहीचा शिरकाव; मुंबई महापालिकेसाठी आमदार-खासदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी

डिजिटल पुणे    01-01-2026 18:36:23

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपातही ही बाब समोर आल्यानंतर भाजपने आमदार-खासदारांच्या मुलांना थेट उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात घराणेशाही पाहायला मिळत आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाकडून आमदार, खासदार आणि माजी लोकप्रतिनिधींच्या मुला-मुलींसह नातेवाईकांना थेट उमेदवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. जवळपास 8 वॉर्डांमध्ये पक्षातील बड्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आलं आहे.

8 आमदार-खासदारांच्या घरातच उमेदवारी

शिंदे गटाकडून

वॉर्ड 191 – माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर

वॉर्ड 169 – आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर

वॉर्ड 163 (चांदिवली) – आमदार दिलिप मामा लांडे यांची पत्नी शैला लांडे

वॉर्ड 153 (चेंबूर) – आमदार तुकाराम कांते यांची सून तन्वी काते

वॉर्ड 146 (अणुशक्ती नगर) – आमदार तुकाराम काते यांची सून समृद्धी गणेश काते

वॉर्ड 113 (भांडुप) – आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील

वॉर्ड 73 (जोगेश्वरी पूर्व) – खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर

वॉर्ड 183 (धारावी) – माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे

अशा प्रकारे, एकाच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचा सपाटा शिंदे गटात पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

ठाकरे गटावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिंदे गटातच हीच पद्धत अवलंबल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक ठिकाणी अनुभवी कार्यकर्त्यांना डावलून माजी नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरातच तिकीट दिल्याची चर्चा आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या घराणेशाहीमुळे शिंदे गटाला राजकीय टीकेला सामोरं जावं लागत आहे.


 Give Feedback



 जाहिराती