सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 शहर

‘कृतज्ञ मी ! कृतार्थ मी !!’ कार्यक्रम १० जानेवारी २०२६ रोजी

डिजिटल पुणे    05-01-2026 14:12:13

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करणारा  ‘कृतज्ञ मी ! कृतार्थ मी !!’  हा कार्यक्रम  १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. 

'मधुबिंब , मुंबई'निर्मित आणि सौ.नेत्रा ठाकूर प्रस्तुत  हा कार्यक्रम शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता  भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित हा २७३ वा कार्यक्रम असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असल्याची माहिती प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 

या कार्यक्रमाचे लेखन अनंत ओगले यांनी केले असून दिग्दर्शन यतिन ठाकूर यांचे आहे. योगिता बेडेकर आणि यतिन ठाकूर हे या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार आहेत.संगीत संयोजन अनुराग गोडबोले यांनी केले आहे. प्रकाश योजना लक्ष्मण केळकर यांची असून दृकश्राव्य मिश्रण मनोज भाबल यांनी केले आहे. नेपथ्य रवींद्र जंगम, रंगभूषा दीपक लाडकर आणि दृकश्राव्य संकल्पना उपेंद्र तारकुंडे यांची आहे.

हा कार्यक्रम सावरकरांच्या विचारविश्वावर आधारित असून, त्यांचे राष्ट्रप्रेम, कर्तृत्व आणि वैचारिक योगदान कलात्मक सादरीकरणातून रसिकांसमोर उलगडले जाणार आहे. साहित्य, संगीत, अभिनय आणि रंगमंचीय मांडणी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती