सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 राजकारण

प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला धक्का! उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

डिजिटल पुणे    05-01-2026 17:16:10

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेना उबाठा गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक ११ (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

 

 

 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. या सर्वांचे ना. पाटील यांनी पक्षात स्वागत करुन; त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अतिशय आनंद देणारे असून, यापूर्वी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही नांदी आहे,” असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती