सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 शहर

अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली

डिजिटल पुणे    06-01-2026 11:53:38

पुणे : माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत माजी खासदार सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ सारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती