नागपूर : शासनातर्फे सन 2026 हे आंतराष्ट्रीय पशूपालक व गवताळ माळरान वर्ष राबविण्यात येत आहे. या औचित्याने महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत पूर्व विदर्भातील पशूपालन संधी आणि कार्यक्रम याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे विचारमंथन करण्यात आले.
पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम यावर सादरीकरण करण्यात आले तसेच या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) ने जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता बळकट करण्याकरीता महास्ट्राईड (mahaSTRIDE) हा एक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे,याद्वारे संपूर्ण राज्यात सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थात्मक क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी उपायुक्त (नियोजन) अनिल गोतमारे, माफसूचे संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, पशुसंवर्धन विभागाचे नागपूर विभागीय सह आयुक्त सतिश राजू, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्हचे सजल कुलकर्णी यांचासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.