सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 शहर

भारती विद्यापीठ आयएमईडीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२६ ;९ जानेवारी रोजी आयोजन,स्पर्धेचे बारावे वर्ष

डिजिटल पुणे    07-01-2026 15:18:24

पुणे :  भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२६’ चे दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी, एरंडवणे येथे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी दिली.या स्पर्धेचे हे  बारावें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये,कनिष्ठ महाविद्यालय -वरिष्ठ महाविद्यालय शा दोन गटांमध्ये  ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील विजेत्याना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये १२ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास १० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.डॉ. आर. व्ही. महाडिक(उपसंचालक , आय एम ई डी), डॉ. हेमा मिरजी, डॉ. विजय फाळके, डॉ. प्रमोद पवार यांच्यासह संयोजन समिती सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती