सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 जिल्हा

उरण पिरवाडी येथे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    08-01-2026 10:55:50

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय , महालण विभाग फुंडे कॉलेज व  कांदळवन कक्ष , अलिबाग यांनी पिरवाडी समुद्र किनारा उरण येथे स्वच्छता मोहीम राबवली. वीर वाजेकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र दल, वनविभाग–कांदळवन कक्ष अलिबाग, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र ,फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) चिरनेर, लायन्स क्लब उरण गोल्ड, मॅंग्रुऊ कंजर्वेशन मॅनेजमेंट  यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथील नागाव समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आले . महाविद्यालयाचे जवळजवळ २६८  विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. नायब तहसीलदार उरण श्री.नवाळे ,कांदळवन कक्ष अलिबाग चे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर,वन परिमंडळ अधिकारी किशोर सोनावणे,संरक्षण दलाचे (MSF) जवान व साईश्वरी  मॅडम, नरेश गौड आणि भावेश कडू,नागाव ग्रामपंचायत व ग्रामसुधारणा मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत पीरवाडी समुद्र किनारी स्वच्छता मोहीम यशस्वी झाली.

डॉ.आमोद ठक्कर प्र. प्राचार्य वीर वाजेकर कॉलेज फुंडे यांनी आपल्या मनोगतातून पीरवाडी सागर किनारा हा फक्त एक पर्यटनाचे केंद्र म्हणून नसून एक आपल्या भविष्यातील पर्यावरण संवर्धनासाठी व भविष्यातील अन्न  सुरक्षितता साठी कसा आवश्यक आहे ते  विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. "आपला सागर किनारा,आपली जबाबदारी" त्यामुळे आपण येथे सातत्याने स्वच्छता करुन त्यात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन केले. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवाव्यात तसेच पोस्टर तर्फे स्वच्छता संदेश देण्यात आले.पर्यटकांना जर कचरा कुंड्या जागोजागी उपलब्ध असतील तर सजग पर्यटक नेहमीच इतरत्र कचरा करणार नाहीत अशी सूचनावजा विनंती फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर संस्थेचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी सुचविली.

कांदळवन कक्षाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर  यांनीही या गोष्टीला दुजोरा देत लवकरात लवकर या गोष्टींची पूर्तता केली जाईल व ते गरजेचेच आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी कांदळवन कक्ष ह्यांच्या मार्फत हात मोजे, मास्क, पाणी व अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आला.म्हातवली ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी  कर्मचारी व घंटा गाडी उपलब्धकरून दिली. पत्रकार मधुकर ठाकूर, डॉ संदीप घोडके प्रा.राम गोसावी,प्रा.बी. पी  पवार, डॉ राजकुमार कांबळे, गोटपागर सर, डॉ झेलम झेंडे,  प्रा भूषण ठाकुर, प्रा प्रांजल भोईर, प्रा देवेंद्र कांबळे, प्रा योगेश कुलकर्णी आणि अनेक शिक्षक सहभागी झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती