उरण : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता चौथी व सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३० /१२/२०२५ च्या परिपत्रकानुसार शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून सध्या सुरू असणारी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धरतीवरच यावर्षी दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या परीक्षेत सहभाग घेऊन भविष्यासाठी यश संपादन करावे त्यासाठी शासनाने चौथी इयत्तेसाठी रोख रक्कम रुपये ५०० तर सातवीसाठी रोख रक्कम रुपये ७५० शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी www.mscepune.in किंवा http://puppssmsce.in या वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती घेऊन त्वरित आपली नोंदणी करावी. असे आवाहन उरण तालुक्याच्या कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत यांनी संपूर्ण तालुक्यातील शिक्षक वृंदांना तसेच पालकांना केले आहे.