सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 शहर

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये 'इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट'

डिजिटल पुणे    08-01-2026 16:19:54

पुणे : भारती विद्यापीठच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी), पुणे यांच्या वतीने ' इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट-२०२६' चे आयोजन शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी(एरंडवणे) येथे करण्यात आले आहे. उद्योगविश्व  आणि शिक्षणक्षेत्र  यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.,अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी दिली

या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅक्सेन्चरचे व्यवस्थापकीय संचालक अमोल जोशी ,मान्यवर वक्ते म्हणून आयसर्टिस कंपनीचे उपाध्यक्ष  व हेड-एपीएसी  नीरज ठल्ये सहभागी होणार आहेत.भारती अभिमत विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम, कुलगुरू डॉ .विवेक सावजी,  भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा,सौ.स्वप्नाली कदम इत्यादी मान्यवर या परिषदेकरिता उपस्थित राहणार आहेत.
 

दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या परिषदेकरिता प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयआयपीएस -२०२६ ही परिषद उद्योग व शिक्षण क्षेत्रातील संवाद, सहकार्य आणि ज्ञानविनिमयासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती