सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 राजकारण

ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

डिजिटल पुणे    08-01-2026 17:17:13

सांगली: सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासह एकूण आठ जणांना हद्दपार केले आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझी यांच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अशा विविध टोळ्यांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण आठ जणांवर ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आदेश दिले आहेत.

उद्या (9 जानेवारी) मिरज येथे अजित पवार यांची सभा होत असतानाच झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवरून भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

सांगली–कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहम्मद युसूफ काझी याच्यासह आझम काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजीरे, अस्लम काझी, अल्ताफ रोहीले आणि मोहसिन गोदड या आठ जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

इतर हद्दपारीची कारवाई

कुपवाड पोलीस ठाणे: चार जणांना सांगली जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार

विटा पोलीस ठाणे: दोन जणांना सांगली जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार

आटपाडी पोलीस ठाणे: तीन जणांच्या टोळीला सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली.ऐन निवडणुकीत झालेल्या या कठोर पोलिस कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे


 Give Feedback



 जाहिराती