सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 जिल्हा

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंगचा जल्लोष

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    08-01-2026 17:31:39

उरण : बुधवार दिनांक ०७-०१-२०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंग मोठया जल्लोषात व अभूतपूर्व गर्दीत साजरा झाला. यु. ई. एस. च्या भव्य पटांगणात विविध खादय पदार्थांचे व खेळांचे स्टॉल्स लावलेले होते, त्यापैकी पहिल्या स्टॉलला बांधलेली फित कापून यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांनी फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंगचं उद्घाटन केलं. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांत ठक्कर तसेच उपस्थित सर्व सन्माननियांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर व सदस्य व माजी मानद सचिव आनंद भिंगार्डे यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  व यु. ई. एस. चे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव ॲड. राजेंद्र भानुशाली, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, सदस्य व माजी मानद सचिव  आनंद भिंगार्डे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, समन्वयक, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका व पी.टी.ए. सदस्य ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.फन फेअरची सुरुवात झाल्यानंतर बघता-बघता काही क्षणातच यु. ई. एस. चं भव्य मैदान लोकांच्या तुफान गर्दीने फुलून गेलं. फन फेअर सोबतच पॅरेन्टस् इव्हिनिंगच्या कार्यक्रमामध्ये यु. ई. एस. च्या मुख्य व्यासपीठावर पूर्व प्राथमिक विभागाच्या बाल विदयार्थ्यांनी तीन आकर्षक समूह नृत्य सादर केले.

पीटीए सदस्याकडून जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक विजेत्या विदयार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा आणि इतर गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार  यु. ई. एस. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्यां  व पर्यवेक्षिकांच्या हस्ते करण्यात आला.  त्यानंतर शिक्षकांनी व उपस्थित पालकांपैकी काहींनी आकर्षक असे एकल, युगुल व समुह नृत्य, बासरी वादन व सदाबहार गाणी सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. पॅरेन्टस् इव्हिनिंग मध्ये आपली कला सादर करणाऱ्यांना तसेच उत्कृष्ट स्टॉल धारकालाही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. अशा रितीने संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे हा सोहळा मोठया दिमाखात साजरा झाला.


 Give Feedback



 जाहिराती