सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
  • मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 जिल्हा

कुर्ला स्थानकाजवळ सायडिंगमधील लोकलला भीषण आग, दोन डबे जळून खाक; गर्दीच्या वेळेत लोकलसेवा विस्कळीत

डिजिटल पुणे    09-01-2026 15:38:54

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे. कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान ईएमयू सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या जुन्या लोकल ट्रेनला गुरुवारी (9 जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत लोकलचे दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले.

सदर लोकल ही कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणारी असून ती गेल्या अनेक महिन्यांपासून सायडिंगमध्ये निष्क्रिय अवस्थेत उभी होती. सुरुवातीला लोकलमधून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दोन डबे आगीच्या कवेत सापडले.

आग कशी लागली?

प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला ही आग नियंत्रणात येण्यासारखी होती. मात्र, घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्यामुळे आग वाढत गेली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू असून शॉर्ट सर्किट किंवा भंगारातील ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. काही वेळानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.

लोकल सेवा बाधित

ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. अप आणि डाऊन मार्गावरील जलद व धीम्या लोकल काही मिनिटे उशिराने धावत होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा पूर्ववत सुरू केली.सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओदरम्यान, प्रवाशांनी आगीचे थरारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेमुळे कुर्ला स्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, निष्क्रिय लोकल आणि सायडिंगच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती