पुणे : प्रभाग क्रमांक ९ मध्ये मराठवाडा भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मेघना बोर्डीकर यांच्या निवडणुकीदरम्यान लहू अण्णा बालवडकर यांनी दिलेल्या सक्रिय सहकार्याचा विशेष उल्लेख केला. त्या काळात लहू बालवडकर यांनी मनापासून केलेल्या सहकार्यामुळे निवडणूक अधिक बळकट झाली होती, असे त्यांनी सांगितले.
आता त्या सहकार्याची परतफेड करण्याची वेळ आली असून, ती केवळ लहू बालवडकर यांच्या बाजूने मतदान करूनच करता येईल, असे आवाहन आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारांना केले. यावेळी उपस्थित नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.