सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मी आयुष्यातील सर्व आनंद उपभोगलाय, गमावण्यासारखं काहीच नाही, माझ्या नादाला लागलात तर... गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
  • मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
  • राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर घणाघाती टीका; “1500 रुपये 15 दिवसांत संपतात”
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
 जिल्हा

मोठी बातमी : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेंचा राजीनामा; भाजपची नाचक्की

डिजिटल पुणे    10-01-2026 15:54:46

ठाणे : बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि कुळगाव–बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी वरिष्ठांकडे स्वखुशीने राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसापूर्वीच नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आपटेंच्या नियुक्तीनंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत होता. भाजपने तातडीने राजीनामा न घेतल्यास 13 किंवा 14 जानेवारीला मनसेकडून बदलापूरमध्ये मोर्चा व आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध आणि राजकीय दबाव लक्षात घेता तुषार आपटेंनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. संबंधित प्रकरणात ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

या नियुक्तीवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी “लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील व्यक्तीला भाजपने बक्षीस दिले का?” असा सवाल उपस्थित केला होता. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय भाजपसाठी अडचणीचा ठरला असून पक्षाची नाचक्की झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना, “ज्यांनी चूक केली त्यांच्यावर योग्य आणि निष्पक्ष कारवाई होईल,” असे सांगितले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच तुषार आपटेंचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

आपटेंनी राजीनाम्यात नमूद केले आहे की, “मी कुळगाव–बदलापूर नगरपरिषद स्वीकृत/नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालो होतो. मात्र आज, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी, मी स्वखुशीने या पदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा.”


 Give Feedback



 जाहिराती