सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन – साताऱ्यातील हृदयद्रावक घटना

डिजिटल पुणे    11-01-2026 10:42:30

सातारा : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यात घडली. या घटनेमुळे दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.

सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते.

दरम्यान, काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांसह गावात शोकमय वातावरण निर्माण झाले.

आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याच वेळी त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. घरात एका बाजूला नव्या जीवाच्या आगमनाचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला पतीच्या मृत्यूचे दुःख—या दोन्ही भावनांनी कुटुंबीयांना हादरवून सोडले.

नवजात बालिकेने घेतले पित्याचे अखेरचे दर्शन

अंत्यविधीच्या वेळी प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले.

शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती