सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

गावोगावी मैदान हे माझे मिशन : महेंद्रशेठ घरत

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    11-01-2026 18:09:18

उरण : रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण तालुक्यात सध्या क्रिकेट, कबड्डी या खेळांना तरुणांची अधिक पसंती आहे. विशेषतः डे-नाईट क्रिकेटची क्रेझ वाढत आहे; परंतु अनेक गावांना अद्याप अधिकृतरित्या मैदानेच नाहीत. सिडकोने अनेक गावांच्या हजारो एकर गुरचरण जमिनी गिळंकृत केल्या. पूर्वी गावोगावचे तरुण याच मैदानांवर खेळायचे. गेल्या १५ वर्षांपासून सिडकोसोबत पाठपुरावा करून मी शेलघर, मोरावे, गव्हाण, कोपर आदी गावांना अधिकृतरित्या मैदाने मिळवून दिली आहेत. कर्नाळा स्पोर्टस, रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स यांच्या उभारणीत आपला सिंहाचा वाटा आहे. पैसा त्यांचा असेल, पण नियोजनात महत्त्वाची भूमिका आपलीच आहे. मी बोलत नाही तर करून दाखवतो, हे येथील भूमिपुत्रांना माहिती आहे. लवकरच विमानतळबाधित उलवे, तरघर, कोंबडभुजे या गावांनाही संयुक्तरित्या साडेसहा एकरचे मैदानही मिळेल. सध्या 'खेळाचे मैदान' असे आरक्षण टाकले आहे. इतर सोपस्कार पार पडल्यावर त्यांना ते अधिकृतरित्या मैदान मिळेल. मी माझ्या परिने गावोगावी मैदान हे मिशन घेऊन काम करीत आहे. सेझच्या नावाखाली उरण तालुक्यातील बहुसंख्य मैदाने सिडकोने घशात घातली आहेत. मुळेखंड, पागोटे, फुंडे, डोंगरी, बोकडविरा, रांजणपाडा, धुतूम, बामणडोंगरी, शिवाजीनगर, न्हावेखाडी, न्हावा, जावळे इत्यादी प्रकल्पग्रस्तांच्या गावांना अद्यापही सिडकोने मैदाने दिलेली नाहीत. त्या गावांच्या मैदानांसाठी कोणी प्रयत्न केले का, परंतु मी हार मानलेली नाही. भूमिपुत्रांसाठी, दिबांचे कार्य पुढे नेण्यासाठी सिडकोसोबत लढतोय. भूमिपुत्र तरुणांनीही वेळप्रसंगी रस्त्यावर यायची तयारी ठेवावी. गावांना मैदानेच नसतील तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे 'मैदान आणि गावांचा विकास' या विषयावर राजकीय चपला बाजूला ठेवा, मी आपल्या सोबत आहे, असे ठाम मत महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेस चषक उदघाटनावेळी खोपटे येथे व्यक्त केले. शनिवारी मोरावे येथे म्हात्रे चषक, मोठी जुई येथे ग्रिष्मा चषक आदी क्रिकेट टुर्नांमेंटचे उदघाटन केले. तेथेही त्यांनी भूमिपुत्र तरुणांना मैदानांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.


 Give Feedback



 जाहिराती