सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

धक्कादायक! भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    12-01-2026 13:00:17

पुणे :  पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल परिसर) मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडली. याप्रकरणी आदित्य दीपक कांबळे (वय २४) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भाजपचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. यावेळी भाजप तसेच आरपीआयचे कार्यकर्तेही तेथे जमले होते. अचानक परिसरात गर्दी वाढली आणि याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

विशेषतः आरोपी सागर कांबळे याने भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींची नावे निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आहेत. फरासखाना पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती