परभणी: परभणी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणीमध्ये संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ४ दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. दत्ता सोपान पवार याने त्याच्या मिर्झापूर गावातील शेतात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जवळपास १३ महिन्यानंतर दत्ता सोपान पवार याला जामीन मिळालेला होता. जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या गावी मिर्झापूर येथे तो आला होता.
परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार यांनी आपल्या शेतातील खोलीमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे, तब्बल 13 महिन्यानंतर दत्ता पवार यांची दोन-तीन दिवसांपूर्वी जमानत झाली होती, यानंतर तो गावातच राहत होता. अशातच त्यानी आज सकाळी शेतातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
दत्ता सोपान पवार याच्या जमनातीसाठी कुणीही पुढे येत नव्हते, त्यामुळे मोफत विधी सल्ला यांच्यामार्फत वैयक्तिक बाँडवर त्याला जमानत देण्यात आली होती. दत्ता पवार हे कुटुंब दुरावल्याने डिप्रेशनमध्ये होता, कारागृहात असतानाही त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते, अशातच त्यानी या विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती
कुटुंबापासून दुरावलेपणा, सामाजिक तणाव आणि दीर्घकाळ तुरुंगवास यामुळे दत्ता पवार मानसिक तणावात होते. कारागृहात असतानाही त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना व तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. प्रकरणाची दखल देशपातळीवर घेण्यात आली होती. या घटनेप्रकरणी दत्ता सोपान पवार यांना अटक करण्यात आली होती आणि ते जवळपास १३ महिने न्यायालयीन कोठडीत होते. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्याचा जामीन झाल्यानंतर ते तो त्याच्या मिर्जापुर या गावी गेला होता. आज त्यानी सकाळी त्याच्या शेतातील एका खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कळताच पोलीसही मिर्जापुर येथे दाखल झाले आहेत. दत्ता सोपान पवार याची पत्नी आणि दोन मुले हे पुणे येथे राहतात, तर त्याचे इतर नातेवाईक ही परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. जामीन झाल्यानंतर दत्ता पवार हा मिर्झापूर या गावी आला होता. दोन-तीन दिवस राहिल्यानंतर आज त्यानी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांची माहिती
दत्ता पवार यांची पत्नी व दोन मुले पुणे येथे राहतात, तर इतर नातेवाईक परभणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वास्तव्यास आहेत. जामिनानंतर दत्ता पवार एकटेच मिर्झापूर येथे राहत होते.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. आत्महत्येच्या कारणांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.