सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

डिजिटल पुणे    12-01-2026 17:50:34

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे व पोलीस उपनिरीक्षक उदय काळेभोर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक उदय काळेभोर यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले यमुळे आज आपण आहोत. आजच्या सारख्या दळणवळणाच्या सुविधा नसताना दिल्लीपर्यंत मराठेशाहीचे आटकेपार झेंडे लावण्याचे काम छत्रपतींनी केले. असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते. स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण केले ते युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. असे सांगितले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. अनिल जगताप, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. अनिल लोंढे ,  डॉ. अशोक ससाणे, डॉ. गणेश गांधीले,  डॉ. अजय कवाडे, डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी मानले.याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद यांच्यावरील 'शोध स्वामी विवेकानंदांचा' या डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. गणेश गांधिले, प्रा. शितल गायकवाड व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांनी चर्चा केली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती