सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

कळवे ( पेण ) मध्ये अनोखा आनंद देणारे कविसंमेलन रंगले

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    13-01-2026 11:04:01

उरण : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )पेण शाखेचे पोपटी कवि संमेलन कळवे या गावी शेतामध्ये प्रसन्न वातावरणात साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.अध्यक्षीय भाषणात प्रा.एल बी यांनी जिल्ह्यात झालेल्या पोपटी संमेलनात  केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी,सुरेश वाजेकर, बळीराम भालेकर आणि लवेंद्र मोकल यांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले.यावेळी रायगड कोमसाप कोषाध्यक्ष एड.गोपाळ शेळके, ज्येष्ठ कवी म.वा.म्हात्रे, नाटककार चंद्रकांत पाटील, कोमसाप उरण अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, जिल्हा प्रतिनिधी एस.एस.पाटील इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती.स्वागत प्रास्ताविक पेण शाखाध्यक्ष लवेंद्र मोकल यांनी केले तर सुरेख सूत्रसंचालन प्रकाश ठाकूर यांनी केले.
         
  दीप प्रज्वलनानंतर पोपटीची सुगंधी शेतमळ्यातील चव कवी आणि उपस्थित प्रेक्षकांना मनसोक्त घेता आली.पोपटीचा आनंद घेतांघेतां म.वा.म्हात्रे,सदानंद ठाकूर, संतोष जोहेकर,म.का.म्हात्रे, अजय शिवकर, रामनाथ पेंटर,डी.एल.पाटील, मोहनलाल म्हात्रे, जनार्दन सताणे,न.ग. पाटील, मनोज म्हात्रे,नरेश पाटील, संतोष ठाकूर,गणेश पाटील, नरेश म्हात्रे,लवेंद्र मोकल, गोपाळ शेळके, साहित्यरत्न प्रा एल.बी. इत्यादी कवींनी दर्जेदार कविता सादर करून पोपटीला रंगत आणली.विशेष म्हणजे पोपटी,दारू, नीतीअनिती,प्रेम,सामाजिक प्रश्न, दूषित राजकारण,पोवाडा, शिवाजी महाराजांच्या जीवन विषयक कवितांनी भारावून टाकणारे वातावरण निर्माण केले.त्यानंतर उपस्थितांनी शेतमळ्यातील शाकाहारी आणि मांसाहारी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला.अशा प्रकारे रायगड जिल्हा कोमसापचे २१ वे आणि शाखेचे दुसरे पोपटी कविसंमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले.
 
 


 Give Feedback



 जाहिराती