सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 विश्लेषण

उरणात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु ;फुंडे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी लुटला पोपटीचा आनंद

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    13-01-2026 11:07:15

उरण : रायगड - उरण तालुका "पोपटी" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या उरण तालुक्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने. खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे.फुंडे महाविद्यालयातील १९९८-९९ मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कोप्रोली येथे एकत्र येऊन आपल्या विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत ,हसत, खेळत,गप्पा ,मज्जा मस्ती करत लुटला.

वालाच्या शेंगां भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या उरणात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली असली तरीसुद्धा पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगाच वापरल्या जात आहे. रायगड सह उरणच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र सध्या येथील गावठी शेंगा अजुन तयार झाल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या शेंगावरच खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. अजुन साधारण पंधरा - वीस दिवसानंतर तालुक्यातील गावठी वाल तयार होऊ लागतील आणि खऱ्या अर्थाने पोपटीला ती विशिष्ठ चव येणार आहे. या पोपटीतील वालाच्या शेंगा कितीही खाल्या तरी त्या पोटाला बाधत नाही हे त्यांचे वैशिष्ट आहे. पुण्यावरुन आलेल्या शेंगा साधारण ४० ते ५० रुपये किलोनी मिळत आहेत.
 

विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजुन केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच रायगड-उरण मध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण घेवाणही होते.अशातच फुंडे महाविद्यालयात १९९८-९९ मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रविवारी पोपटी संमेलनाचे आयोजन केले होते.यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत हसत,खेळत, गप्पा, मज्जा मस्ती करत लुटला आहे.यावेळी सर्व सहकार्यांना एकत्र आणण्याचे काम आदर्शवत विद्यार्थी मेघा भोईर, संजीवनी म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, अलंकार म्हात्रे, मेघनाथ पाटील, संध्या घरत,उत्तम पाटील, गंधार पाटील, प्रभाकर गावंड, गिरीश पाटील, महेंद्र घरत, दिनेश म्हात्रे, रुपाली म्हात्रे,सुरेखा म्हात्रे, दमयंती पाटील, रंजित माळी, मनोजकुमार ठाकूर,सुवर्णा पाटील, राजेंद्र पाटील, विनोद ठाकूर, ज्योत्स्ना पाटील, प्रसाद पाटील, नवनीत पाटील, नितीन नारंगीकर यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती