सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 शहर

स्व.माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘माणिक स्मृती’ कार्यक्रम ;भारतीय विद्या भवन ,इन्फोसिस फाउंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

डिजिटल पुणे    13-01-2026 15:00:06

 पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि.१७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘माणिक स्मृती’ हा सांगीतिक  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम चतुरस्त्र  शास्त्रीय गायिका स्व.माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली म्हणून सादर केला जाणार आहे.या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कल्याणी जोशी यांचे  गायन सादर होणार असून त्यांना हार्मोनियमवर डॉ.प्रवीण कासलीकर आणि तबल्यावर  केदार टिकेकर यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अस्मि अच्युते करणार आहेत.हा कार्यक्रम भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू  सभागृह, (सेनापती बापट रस्ता ) येथे आयोजित करण्यात आला आहे.

 भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७५ वा कार्यक्रम आहे. सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असल्ल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.‘माणिक स्मृती’ या कार्यक्रमातून माणिक वर्मा यांच्या गायकीची परंपरा, भावसंपन्न रचना आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान रसिकांसमोर उलगडले जाणार आहे. संगीतप्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती