पुणे : “ही रॅली केवळ प्रचारासाठी नव्हे, तर विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करणारी होती,” असे स्पष्ट वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. रॅलीला नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि विश्वासाने प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागातील चारही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत मोहोळ म्हणाले की, प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल. भाजपचा कार्यकर्ता हा विचाराने चालणारा, संस्कृतीने काम करणारा आणि निष्ठेने सेवा करणारा असतो, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे.
भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष आणि विचारसरणीला सर्वोच्च स्थान दिले जाते, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, प्रभागातील चार उमेदवारांना मतदान करणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणे होय.
भाजपमधील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेचा विश्वास संपादन करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपचाच असणार, हे जवळपास निश्चित असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ०९ हा भाजपचा बालेकिल्ला असून येथील मतदार कमळ चिन्हालाच मतदान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “१६ तारखेला हा प्रभाग ४–० ने भाजपच्या पारड्यात जाणार,” असा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.