सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 क्राईम

संपत्तीसाठी एकुलत्या एक जावयाचा घात; मित्राच्या मदतीने सासऱ्याची निर्घृण हत्या ;मृतदेह पुलाखाली लपवून आरोपी फरार, अखेर पोलिसांच्या जाळ्यात

डिजिटल पुणे    14-01-2026 15:05:37

भंडारा : सासऱ्याची संपत्ती मिळावी या लालसेपोटी एकुलत्या एक जावयानेच सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मित्राच्या मदतीने सासऱ्याचा खून करून मृतदेह पुलाखाली लपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, कारधा पोलिसांनी या प्रकरणी जावई आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

मृताचे नाव किशोर कंगाले (वय 60) असून ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमित लांजेवार (वय 36, जावई) आणि योगेश पाठक (वय 26, मित्र) यांचा समावेश आहे. ही घटना भंडाऱ्याच्या कोकणागड परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जानेवारी रोजी किशोर कंगाले हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कोकणागड येथून शिंगोरी येथील शेताकडे जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतशिवारातील पुलाखालील पाईपमध्ये लपवून ठेवण्यात आला.

कंगाले यांना एकुलती एक मुलगी असून तिने अमित लांजेवार याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला किशोर कंगाले यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे त्यांनी मुलगी आणि जावयाला संपत्तीतून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा संशय जावयाला होता. याच वादातून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, वडिलांशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अमित लांजेवारला नागपूर येथून तर त्याचा मित्र योगेश पाठकला रामटेक येथून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती