सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 राजकारण

मतदानाला जाताना दिवंगत नवऱ्याचा फोटो पाहून तेजस्वी घोसाळकर भावूक, म्हणाल्या – “आज अभिषेकची खूप आठवण येतेय”

डिजिटल पुणे    15-01-2026 10:51:52

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत असलेल्या तेजस्वी घोसाळकर या मतदानाच्या दिवशी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरातून मतदानासाठी निघण्यापूर्वी त्यांनी देवाची पूजा केली. त्यानंतर दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या तसबिरीला नमन करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

अभिषेक घोसाळकर यांची काही काळापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या धक्क्यानंतर प्रथमच तेजस्वी घोसाळकर या एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होताना त्यांनी हुंदका दिला.यावेळी बोलताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “मला पहिल्यांदाच निवडणुकीला एकटीला सामोरे जावे लागत आहे. अभिषेक असायचा तेव्हा सगळी कामं तोच पाहायचा. आज त्याची खूप आठवण येतेय. पण त्याची साथ आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.”

तेजस्वी घोसाळकर या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत असून ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधात धनश्री कोलगे या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर यांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी देवाची पूजा करून प्रचार आणि संघर्षाच्या या टप्प्यात आत्मविश्वास व्यक्त केला. वॉर्ड क्रमांक 2 मधील ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती