सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 जिल्हा

लातूर महानगरपालिका निवडणूक : ७७ व्या वर्षीही श्रीमती सुमेधा दाते यांचा मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग

डिजिटल पुणे    15-01-2026 15:23:00

लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, ७७ वर्षीय श्रीमती सुमेधा सदाशिव दाते यांनी दाखवलेला उत्साह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. वय हा केवळ आकडा आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले.

लातूर येथील प्रमोद गॅस एजन्सीच्या संचालिका असलेल्या सुमेधा दाते यांनी आयुष्यभर व्यवसाय, कुटुंब आणि समाज यांचा समतोल साधत किमान २०० लोकांना रोजगार व आधार दिला. आजही तोच आत्मविश्वास, तीच ऊर्जा आणि लोकशाहीबद्दलची तीच बांधिलकी त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.

तरुण पिढीलाही लाजवेल असा जोश दाखवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. “मतदान म्हणजे आपली जबाबदारी” हा संदेश त्यांनी कृतीतून दिला असून, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लोकशाही अधिक बळकट करत असल्याचे हे उदाहरण ठरत आहे.लातूरमध्ये मतदान हा केवळ अधिकार न राहता एक सामाजिक कर्तव्य आणि उत्सव बनत असल्याचे हे दृश्य बोलके ठरत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती